बौद्धिक संपदा : माहिती आणि गुणदोष (Intellectual Property: Information and Pros and Cons)
Marathi Abstract: बुद्धिमत्तेला मालमत्तेच्या दृष्टीने पाहणे आणि तिचे मालमत्तेसारखे रक्षण करणे या कल्पना संगणक युगाची देण आहेत. या मालमत्तेला आपल्या अपरोक्ष कोणीही वापरू शकणार नाही, याची तरतूद बौद्धिक संपदा अधिकारात केली जाते. कॉपीराईट, पेटंट हे शब्द आता बौद्धिक संपदेच्या क्षेत्रात महत्त्वाचे मानले जातात. आजच्या संगणक युगात कोणालाही बौद्धिक संपदा अधिकारांची जाणीव असणे आवश्यक आहे. त्याची व्याप्ती समजून घेतली तर त्याची गरज आपल्या लक्षात येईल. मात्र अजूनही या अधिकारांबाबत सर्वसामान्यांना पूर्णतः माहिती नाही. तसेच या अधिकाराचे अनेक फायदे आहेत तसेच यात काही दोषही आहेत. पण आपल्याला निसर्गतः मिळालेल्या किंवा आपण अभ्यासाने मिळवलेल्या बुद्धिमत्तेचे महत्त्व या अधिकारातून अधोरेखित होते, यात शंका नाही